लाडकी बहिण योजना एप्रिल हफ्ता 2.43 कोटी महिलांना जमा लगेच पहा यादी | Ladki Bahin Yojana April Hafta

Ladki Bahin Yojana April Hafta महाराष्ट्र सरकारच्या सर्वाधिक नावाजलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता हा नुकताच सर्व पात्र व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला. योजनेचा हा दहावा हप्ता असल्याने आजवर या योजनेअंतर्गत ज्या महिलांनी सर्वात आधी अर्ज केले होते आणि त्यांचे अर्ज स्वीकारले गेले होते अशा महिलांना सुमारे 15000 रुपये त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले आहेत.

आता योजनेंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता हा सुमारे 2.43 कोटी महिलांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच नक्की कोणत्या महिलांना हे पैसे मिळाले तसेच अजूनही उर्वरित महिलांच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे जमा होणार का अशा सर्व प्रश्नांची उत्तरे खाली देण्यात आलेली आहेत.

Ladki Bahin Yojana Maharashtra :

मित्रांनो 2024 मध्ये ज्यावेळी केंद्र सरकारचे निवडणूक पार पडली त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकारला चांगल्या प्रमाणामध्ये बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाले त्यानंतरच काही महिन्यात महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार होत्या आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र सरकारचे अधिवेशन सुरू होते.

या अधिवेशनामध्ये राज्य सरकार द्वारे महिलांना आर्थिक बळकटीकरण करण्यासाठी आणि महिलांचे जीवन सुधारण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत राज्यभरातील महिलांना अर्थातच ज्या महिला या योजनेच्या अटी व निकषांमध्ये पात्र आहेत अशा महिलांना महिन्याला त्यांच्या बँक खात्यावर 1500 रुपये देण्याची घोषणा झाली आणि योजनेची त्वरित अंमलबजावणी करण्याची देखील आदेश महिला व बालविकास विभागाला देण्यात आले.

त्यानुसारच सुरुवातीला योजनेसाठी मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे सर्व महिलांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली आणि या ॲप्लिकेशन मध्ये देखील विविध प्रकारचे बदल करून जास्तीत जास्त महिलांनी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी राज्य सरकार द्वारे देखील प्रयत्न केले. आणि जून 2024 पासूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यात सुरू झाली आणि ऑगस्ट महिन्यामध्ये योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट असा दोन्ही महिन्यांचा मिळून सुमारे 3000 रुपये लाभ त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला.

Ladki Bahin Yojana New Form :

मोबाईल ॲप्लिकेशन वरती लोड घेत असल्याने काही दिवसानंतर महिला व बालविकास विभागाकडून योजनेसाठी वेबसाईट अथवा पोर्टल देखील लाँच करण्यात आले आणि त्यामुळे जवळील सायबर कॅफे असेल अथवा महा-ई-सेवा केंद्र असेल यामध्ये जाऊन देखील महिला योजनेचा अर्ज करू शकत होत्या.

यासोबतच ज्या महिलांना या सर्व बाबी शक्य नाही त्यांच्यासाठी राज्य सरकार द्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आणि यासाठी अंगणवाडी सेविकांद्वारे लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून देण्याची देखील सुविधा महिला व बाल विकास विभागाने सुरू केले. यामुळेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत गाव खेडे असेल अथवा शहरांमधील देखील अनेक महिलांनी योजनेसाठी आपले अर्ज केले अर्जाची छाननी देखील लवकरात लवकर करण्याचे आदेश महिला व बालविकास विभागांमध्ये देण्यात आले आणि लाडक्या बहिणींची संख्या दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढू लागली.

लाडकी बहिण योजनेसाठी नवीन अर्ज सुरु आहेत का ?

मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी आता नवीन अर्ज प्रक्रिया ही संपूर्णपणे बंद आहे कारण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या ही आत्ताच जवळपास 2.5 कोटींच्या घरात पोहोचली आहे. आणि यामुळेच सध्या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने प्रक्रिया ही ऑक्टोबर महिन्यामध्ये बंद करण्यात आली आहे आणि पुन्हा या योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होणार का नाही याबद्दल देखील राज्य सरकार असेल अथवा महिला व बाल विकास विभागातील यांच्याद्वारे कोणत्याही प्रकारची नवीन माहिती देण्यात आलेली नाहीये कारण जोपर्यंत सर्व महिलांची छाननी प्रक्रिया पूर्ण होत नाही आणि त्यामधून लाभार्थी महिलांचा आकडा समोर येत नाही तोवर योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया बंद राहण्याची दाट शक्यता आहे.Ladki Bahin Yojana April Hafta Date

Ladki Bahin Yojana यादी Maharashtra 2025 :

लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता दिनांक 02 मे पासून सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आणि दिनांक 05 मे 2025 पर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत रक्कम जमा करण्यात आली. आता यामध्ये काही महिला अजूनही अशा आहेत की ज्यांचं मत आहे त्यांना योजनेचा लाभ असेल किंवा रक्कम असेल अजूनही जमा झालेली नाहीये तर ज्या महिलांना जानेवारी असेल अथवा फेब्रुवारी महिन्यापासून योजनेअंतर्गत पैसे येत नाहीत त्या महिलांना छाननी प्रक्रियेमधून बाद केल्याची शक्यता आहे आणि त्यांना यापुढे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत कारण योजनेअंतर्गत पुनर तपासणी सुरू असल्याचे आपल्याला देखील माहिती आहे.

लाडकी बहिण योजना निकष व अटी खालीलप्रमाणे आहेत –

  • योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्रातील रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  • लाभ घेणारी महिला ही 21 ते 65 वर्ष वयोगटातील असणे बंधनकारक आहे.
  • लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावरती ट्रॅक्टर वगळता इतर कोणतेही चार चाकी वाहन नसावे.
  • योजनेचा लाभ घेणारी महिला सरकारी नोकरीला नसावी.
  • महिलेच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरदार अथवा सेवानिवृत्ती वेतन घेणारा नसावा.
  • लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती आमदार, खासदार अथवा जिल्हा परिषद सदस्य राहिलेला नसावा.
  • लाभ घेणाऱ्या महिलेच्या नावावरती पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन नसावी.
  • लाभ घेणारी महिला संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वेतन योजना या योजनेची लाभार्थी नसावी.
  • लाभ घेणारे महिला अथवा तिच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा आयकर दाता म्हणजेच की इन्कम टॅक्स भरणारा नसावा.
  • एका कुटुंबातून एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोनच महिला योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र आहेत.
Ladki Bahin Yojana List Maharashtra 2025 :

या बहिणींना मिळणार केवळ 500 रुपये महिना –

लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागील काही महिन्यांपासून काही पात्र महिलांच्या बँक खात्यावर मिळणारा लाभ हा पाचशे रुपये प्रमाणे मिळत आहे यामध्ये ज्या महिला शेतकरी आहेत आणि शेतकरी असून पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत अशा महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यासोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याद्वारे देखील स्पष्ट करण्यात आलेले आहे.

कारण शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला यांना या दोन्ही योजनेअंतर्गत म्हणजेच की केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गत आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला 12000 रुपये मिळतात आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना पाचशे रुपये प्रमाणेच म्हणजेच वर्षाला 6000 रुपये दिले जाणार आहेत जेणेकरून त्यांना देखील वार्षिक लाडक्या बहिणी प्रमाणे 18000 रुपये मिळणार आहेत.

Ladki Bahin Yojana April Hafta

लाडक्या बहिणींना महिना 2100 रुपये कधीपासून मिळणार ?

महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे यावेळी निवडणुकां दरम्यान आम्ही पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वाढ होऊन आम्ही लाडक्या बहिनींना महिन्याला 2100 रुपये देऊ असे आश्वासन देण्यात आले होते. आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी 2100 रुपये कधीपासून होणार असे सर्व पात्र महिला विचारत आहेत. Ladki Bahin Yojana April Hafta List

महाराष्ट्र राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन यावेळी मार्च महिन्याच्या दरम्यान पार पडले आणि त्यानंतर एप्रिल महिन्यापासून लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये मिळतील अशी आशा सर्व लाडक्या बहिणींना होते परंतु तसे मात्र झाले नाही आणि एकवीसशे रुपये बद्दल कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यावर बोलताना उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की ज्यावेळी राज्याची आर्थिक स्थिती सुधारणार आहे त्याच वेळी लाडक्या बहिणींना निधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल कारण सध्या राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने 2100 रुपयांचा निर्णय आम्ही लगेच घेऊ शकत नाही.

योजनेबद्दल अधिकच्या माहितीसाठीक्लिक करा
सरकारी योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा