Ladki Bahin May Installment Date : लाडकीला यादिवशी मिळणार मे हफ्ता एकत्रित 3000 रुपये ?

Ladki Bahin May Installment Date नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण नुकतेच पार पडले या एप्रिल महिन्याच्या अर्थातच दहाव्या हप्त्याच्या वितरणामध्ये काही प्रमाणामध्ये उशीर देखील झाला कारण संपूर्ण एप्रिल महिना या योजनेच्या हप्त्याच्या लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या परंतु बहिणींना लाभ मिळाला तो मे महिन्यामध्ये.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच लाडकीला महिन्याचा हप्ता हा अक्षय तृतीय दिवशी मिळणार असे काही मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात आले होते आणि त्यामुळेच दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण होईल असे लाडक्या बहिणींना वाटत होते परंतु हप्ता मिळण्यास मात्र उशीर झाला.

आता लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना कधी जमा होणार असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना पडला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आणि एक अपडेट देखील आपण आज पाहणार आहोत.

Ladki Bahin May Hafta Date 2025 :

मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे कारण आपण पाहिलं की कालच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार राज्यांमध्ये आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महानगरपालिका असतील या सर्व निवडणुका आता 04 महिन्यांच्या कालावधीमध्येच पार पाडणार आहेत.

आणि या निवडणुकांसाठी देखील विधानसभेच्या निवडणुका प्रमाणे लाडक्या बहिणी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहेत कारण बहिणींचे मतदान हे पुन्हा एकदा निर्णय ठरणार आहे. आणि त्यामुळेच इतर अनेक योजना असतील किंवा विकास कामांचा देखील निधी काही प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना मिळाला तरी देखील चालेल परंतु लाडकी बहीण योजनेचा निधी मात्र थांबला नाही पाहिजे असे मंत्रिमंडळ बैठकीत देखील मंत्र्यांद्वारे बोलले जात आहे. आता मे महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना लवकरात लवकर त्यामुळेच जमा केला जाणार आहे.

मित्रांनो आपण पाहिलं की लाडकी बहीण योजनेचे हप्त्याचे वितरण सुरू झाल्यापासून या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला या पात्र आणि लाभार्थी असल्याने योजनेसाठी लागणारा निधी देखील भरपूर प्रमाणात सरकारकडे लागत आहे. यासाठी इतर कुठल्याही विभागामार्फत अथवा कर्ज काढून तरीही चालेल परंतु लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लाभ मिळाला पाहिजे असे देखील मत येत आहेत.

Ladki Bahini May Hafta List :

मित्रांनो 2024 मध्ये ज्यावेळी केंद्र सरकारचे निवडणूक पार पडली त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकारला चांगल्या प्रमाणामध्ये बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाले त्यानंतरच काही महिन्यात महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार होत्या आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र सरकारचे अधिवेशन सुरू होते.

या अधिवेशनामध्ये राज्य सरकार द्वारे महिलांना आर्थिक बळकटीकरण करण्यासाठी आणि महिलांचे जीवन सुधारण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत राज्यभरातील महिलांना अर्थातच ज्या महिला या योजनेच्या अटी व निकषांमध्ये पात्र आहेत अशा महिलांना महिन्याला त्यांच्या बँक खात्यावर 1500 रुपये देण्याची घोषणा झाली आणि योजनेची त्वरित अंमलबजावणी करण्याची देखील आदेश महिला व बालविकास विभागाला देण्यात आले.

त्यानुसारच सुरुवातीला योजनेसाठी मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे सर्व महिलांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली आणि या ॲप्लिकेशन मध्ये देखील विविध प्रकारचे बदल करून जास्तीत जास्त महिलांनी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी राज्य सरकार द्वारे देखील प्रयत्न केले. आणि जून 2024 पासूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यात सुरू झाली आणि ऑगस्ट महिन्यामध्ये योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट असा दोन्ही महिन्यांचा मिळून सुमारे 3000 रुपये लाभ त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला.Ladki Bahin May Installment Date

Ladki Bahin Yojana May Hafta Kadhi Yenar ?

लाडकी बहिण मे हफ्ता दुसऱ्या आठवड्यात जमा होणार ?

लाडकी बहीण अंतर्गत सुरुवातीला आपण पाहिले की हप्त्याची वितरण हे दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यामध्येच केले जायचे जेणेकरून लाडक्या बहिणींचे महिन्याचे आर्थिक गणित देखील या हप्त्यावरती बसायचे अथवा अवलंबून असत. परंतु मागील काही महिन्यांपासून अर्थातच विधानसभा निवडणुका नंतर लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास काही प्रमाणामध्ये दिरंगाई देखील झाल्याचे पाहायला मिळाले ज्याची तक्रार देखील अनेक वेळा लाडक्या बहिणींनी केली.

विरोधी पक्षातील अनेक नेत्यांकडून किंवा आमदारांकडून देखील याबाबत सतत बोललं जात होतं की लाडकी बहीण योजना आता बंद होणार आहे कारण सरकारकडे कुठल्याही प्रकारचे निधी अथवा पैसे नसल्याने लाडके बहीण योजना लवकरच बंद होणार असे वारंवार विरोधी पक्षाकडून बोलले जात होते परंतु यावर राज्य सरकार द्वारे वारंवार एकच उत्तर मिळत होता की काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि लाडक्या बहिणींसाठी सरकार म्हणजेच की त्यांचे भाऊ खंबीरपणे त्यांच्यासोबत उभा आहे.

आता मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे कारण यापुढील काही महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण हे वेळोवेळी करून सरकार पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वर्चस्व दाखवू शकते

Ladki Bahin Yojana New Registration Process :

लाडकी बहिण योजना निकष व अटी खालीलप्रमाणे आहेत –

  • योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्रातील रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  • लाभ घेणारी महिला ही 21 ते 65 वर्ष वयोगटातील असणे बंधनकारक आहे.
  • लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावरती ट्रॅक्टर वगळता इतर कोणतेही चार चाकी वाहन नसावे.
  • योजनेचा लाभ घेणारी महिला सरकारी नोकरीला नसावी.
  • महिलेच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरदार अथवा सेवानिवृत्ती वेतन घेणारा नसावा.
  • लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती आमदार, खासदार अथवा जिल्हा परिषद सदस्य राहिलेला नसावा.
  • लाभ घेणाऱ्या महिलेच्या नावावरती पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन नसावी.
  • लाभ घेणारी महिला संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वेतन योजना या योजनेची लाभार्थी नसावी.
  • लाभ घेणारे महिला अथवा तिच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा आयकर दाता म्हणजेच की इन्कम टॅक्स भरणारा नसावा.
  • एका कुटुंबातून एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोनच महिला योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र आहेत.

लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता दिनांक 02 मे पासून सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आणि दिनांक 05 मे 2025 पर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत रक्कम जमा करण्यात आली. आता यामध्ये काही महिला अजूनही अशा आहेत की ज्यांचं मत आहे त्यांना योजनेचा लाभ असेल किंवा रक्कम असेल अजूनही जमा झालेली नाहीये तर ज्या महिलांना जानेवारी असेल अथवा फेब्रुवारी महिन्यापासून योजनेअंतर्गत पैसे येत नाहीत त्या महिलांना छाननी प्रक्रियेमधून बाद केल्याची शक्यता आहे आणि त्यांना यापुढे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत कारण योजनेअंतर्गत पुनर तपासणी सुरू असल्याचे आपल्याला देखील माहिती आहे.Ladki Bahin May Installment Date

लाडकी बहिण योजनेसाठी नवीन अर्ज सुरु आहेत का ?

मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी आता नवीन अर्ज प्रक्रिया ही संपूर्णपणे बंद आहे कारण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या ही आत्ताच जवळपास 2.5 कोटींच्या घरात पोहोचली आहे. आणि यामुळेच सध्या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने प्रक्रिया ही ऑक्टोबर महिन्यामध्ये बंद करण्यात आली आहे आणि पुन्हा या योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होणार का नाही याबद्दल देखील राज्य सरकार असेल अथवा महिला व बाल विकास विभागातील यांच्याद्वारे कोणत्याही प्रकारची नवीन माहिती देण्यात आलेली नाहीये कारण जोपर्यंत सर्व महिलांची छाननी प्रक्रिया पूर्ण होत नाही आणि त्यामधून लाभार्थी महिलांचा आकडा समोर येत नाही तोवर योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया बंद राहण्याची दाट शक्यता आहे.

Ladki Bahin May Installment Date
Ladki Bahin Yojana Maharashtra 2025 FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न)

Q : लाडकी बहीण योजना मे महिन्याच्या हप्त्याची तारीख ठरली आहे का ?

A – नाही अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही परंतु मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अथवा तिसऱ्या आठवड्यात पैसे येऊ शकतात.

Q : लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू आहे का ?

A – नाही योजनेसाठी सध्या तरी कुठल्याही प्रकारची नवीन अर्ज प्रक्रिया सुरू नाही.

Q : एका कुटुंबांमधून किती महिला लाडकी म्हणून योजनेचा लाभ घेऊ शकतात ?

A – एका कुटुंबांमधून एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोन महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र आहेत.

Q : लाडकी बहीण योजना बंद होईल का ?

A – नाही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.Ladki Bahin May Installment Date

योजनेबद्दल अधिकच्या माहितीसाठीक्लिक करा
सरकारी योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा