Namo Shetkari Next Installment Date राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या योजनांपैकी एक म्हणजेच नमो शेतकरी महासन्माननिधी योजना आणि या योजनेसाठीच विधानसभा निवडणुकांवेळी महायुती सरकारने आश्वासन दिले होते की ज्यावेळी राज्यात पुन्हा महायुती सरकार येईल आणि महायुती सरकारचा मुख्यमंत्री होईल त्यावेळी शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे वाढवले जातील आणि राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वार्षिक 15000 रुपये मिळतील.
आणि या घोषणेमुळेच केव्हापासून नमो शेतकरी योजनेअंतर्गत निधी वाढणार याची चौकशी शेतकरी वारंवार करताना पाहायला मिळत होते राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च महिन्यामध्ये पार पडले आणि त्यावेळेस नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वारीबद्दल घोषणा करण्यात येईल असे सर्व शेतकऱ्यांचे मत होते अथवा शेतकरी आशा लावून बसला होता परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देखील या निधीच्या वाढीबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही अथवा घोषणा देखील केली नाही आणि त्यामुळेच मंत्रिमंडळ बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष होते.
Namo Shetkari Yojana Status :
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर देखील अनेक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पार पडल्या यामध्ये विविध प्रकारचे निर्णय घेण्यात आले परंतु यामधून आता शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झालेला आहे कारण नमो शेतकरी योजनेचा निधी वाढवला जाणार नसल्याचे आता स्पष्ट करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजगी आहे.
राज्यातील शेतकरी मागील अनेक वर्षांपासून अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल अथवा विविध नैसर्गिक संकटांना तोंड देत आहे आणि त्यामुळेच शेतकरी कर्जबाजारी देखील झालेला असून राज्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण देखील शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे. यातच शेतकरी कर्जमाफी करण्याचे महायुती सरकारने आश्वासन दिले होते परंतु त्यामध्ये देखील आता लगेच कर्जमाफी शक्य नसल्याचे मंत्र्यांकडून सांगितले जात आहे
आणि त्यामुळेच कर्जमाफी देखील नाही नमो शेतकरी योजनेचा निधी देखील वाढणार नाही असा अनेक कारणांमुळे शेतकरी मात्र नक्कीच संकटात सापडला आहे. आपण पाहिले की खरीप हंगामातील पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजूनही जमा होत नाही आहेत आणि या अशा अनेक कारणांमुळेच शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.Namo Shetkari Next Installment Date
Namo Shetkari Yojana 7th Installment Date :
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पुढील हप्ता कधी येणार ?
योजनेच्या पुढील हप्त्यासाठी देखील आता राज्य सरकार द्वारे लवकरच प्रक्रिया राबवली जाणार असून यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. यावेळी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेऊन निधी वाढवला जाईल अशी आशा अनेक शेतकऱ्यांना होते आणि त्यामुळेच पुढील मिळणारा हप्ता हा 3000 रुपये मिळेल असे देखील शेतकऱ्यांना वाटत होते.
परंतु याबद्दल सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की नमो शेतकरी योजनेसाठी सध्या राज्य सरकार निधी वाढ होऊ शकत नाही आणि त्यामुळे पुढील देखील जमा होणारा हफ्ता हा पूर्वीप्रमाणे 2000 रुपयांनीच शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे.
नमो शेतकरी योजना पुढील हफ्ता फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार –
नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता हा फक्त ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे फार्मर आयडी काढले आहे अथवा ऍग्री स्टॅक साठी नोंदणी केली आहे केवळ त्याच शेतकऱ्यांना जमा होणार असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही अजूनही तुमचे फार्मर आयडी रजिस्ट्रेशन केले नसल्यास तुम्हाला परिणामी यापुढे नमो शेतकरी योजना असेल अथवा पीएम किसान सन्मान योजना असेल या योजनांचा लाभ दिला जाणार नसल्याची नोंद तुम्ही घ्यायची आहे.
फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे आणि हे काढण्यासाठी तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरून देखील प्रक्रिया करू शकता आणि मोबाईल वरून तुम्हाला शक्य नसल्यास तुम्ही तुमच्या जवळील सीएससी सेंटर असेल अथवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन देखील तुमचे फार्मर आयडी अथवा रजिस्ट्रेशन करू शकता
Namo Shetkari Yojana New Registration Process :
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नवीन अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया –
नमो शेतकरी योजनेचा अर्ज करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला पीएम किसान च्या वेबसाईटवरूनच अर्ज करावा लागणार आहे कारण दोन्ही योजनेसाठी एकाच वेबसाईटवरून तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागणार आहे म्हणजेच पीएम किसान चा लाभ तुम्हाला सुरू झाल्यास तुम्हाला नमो शेतकरी योजनेअंतर्गत आपोआप पात्र करून घेतले जाते. आता पीएम किसान या योजनेसाठी अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया तुम्हाला खाली देण्यात आली आहे.
- सर्वात प्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर pmkisan.gov.in या वेबसाईट वरती यायचं आहे.
- वेबसाईटवर आल्यानंतर वरती दिसणाऱ्या पर्यायांमध्ये तुम्हाला New Farmer Registration हा पर्याय निवडायचा आहे.
- त्यानंतर पुढील ओपन झालेल्या विंडोमध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर टाकून तुमचे राज्य निवडायचे आहे आणि समोरील चौकोनात दिसणारा कॅप्चा कोड टाकून गेट ओटीपी या बटणावर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबर वर आलेला तुम्हाला सहा अंकी ओटीपी टाकून पुढे प्रोसेस करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर योजनेसाठी अर्ज ओपन होणार आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, तुमचा तालुका, तुमचे गाव या संदर्भातील माहिती आधीच आलेली पाहायला मिळणार आहे कारण तुमच्या आधार कार्ड वरून त्या सर्व डिटेल्स घेतल्या जातात त्या सर्व डिटेल बरोबर आहेत का हे तुम्हाला पाहायचे आहे.
- आता फॉर्ममध्ये तुम्हाला इतर जी माहिती विचारली आहे ती सर्व माहिती भरावी लागणार आहे जसे की तुमचा रेशनिंग कार्ड चा नंबर असेल अथवा तुमचा लँड रजिस्ट्रेशन आयडी.
- लँड रजिस्ट्रेशन आयडीच्या ठिकाणी तुम्हाला तुमचा फेरफार चा नंबर तो असणार आहे तो नंबर टाकायचा आहे.
- बँकेची डिटेल टाकावी लागत नाहीत कारण तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावर हे पैसे डीबीटी द्वारे जमा केले जातात.
- त्यानंतर खाली जमिनी विषयीच्या माहितीमध्ये तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे.
- आणि शेवटी तुमचे आधार कार्ड, सातबारा व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे.
- त्यानंतर तुमचे सर्व डिटेल्स तपासले जातील आणि योग्य माहिती असल्यास तुम्हाला योजनेसाठी पात्र केले जाईल आणि पुढील पैसे तुम्हाला जमा होतील.Namo Shetkari Next Installment Date

Namo Shetkari Samman Nidhi Installment Date :
नमो शेतकरी योजना पात्रता व निकष काय आहेत ?
- पी एम किसान अथवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी हा अल्पभूधारक शेतकरी असावा.
- शेतकऱ्याच्या स्वत:च्या नावावर शेतजमीन असावी.
- नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेणारा शेतकरी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. शेतकरी वा त्याच्या कुटुंबातील कोणती व्यक्ती सरकारी नोकरदार नसावा.
- नमो शेतकरी अथवा पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी आमदार, जिल्हा परिषद सदस्य अथवा पंचायत समिती सदस्य नसावा.
- शेतकरी दांपत्यापैकी एकालाच या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे.
- शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन २०१९ पूर्वी झालेली असावी.
- लाभ घेण्यासाठी शेतकरी इन्कम टॅक्स अथवा आयकर भरणारा नसावा.
- शेतकऱ्याचे वय 18 ते 60 वर्षादरम्यान असावे
नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे अथवा वर्ग करण्यात आला आहे. सहाव्या हप्ता बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये महाराष्ट्र राज्यातून तब्बल 93 लाख 20 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या हप्त्या अंतर्गत निधी जमा करण्यात आलेला आहे.
यावेळी मागील काही प्रलंबित हप्ते देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले असल्याने शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यामध्ये या निधी अंतर्गत मोठा फायदा झालेला आहे. राज्य सरकार पीएम किसान योजनेसाठी तसेच नमो शेतकरी योजना असेल अथवा प्रधानमंत्री पिक विमा योजना असेल या योजनेच्या लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा यासाठी देखील वेळोवेळी प्रबोधन करत आहे.
Namo Shetkari Yojana Next Installment FAQ’s :
Q : नमो शेतकरी योजना निधी वाढला का ?
A – नाही.नमो शेतकरी योजनेचा निधी वाढलेला नाही.
Q : नमो शेतकरी योजना नवीन अर्ज प्रक्रिया सुरू आहे का ?
A – होय या योजनेसाठी तुम्हाला पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचे आहेत.
Q : नमो शेतकरी योजने अंतर्गत वार्षिक किती लाभ मिळतो ?
A – नमो शेतकरी योजने अंतर्गत वर्षाला 6000 रुपये मिळतात.
Q : या दोन्ही योजनांचे लाभ वेगवेगळे आहेत का ?
A – होय नमो शेतकरी योजने अंतर्गत सहा हजार रुपये आणि पीएम किसान योजने अंतर्गत सहा हजार रुपये असे वर्षाला शेतकऱ्यांना 12000 रुपये मिळतात.
📃नमो शेतकरी लाभार्थी यादी पाहण्यासाठी | 👉क्लिक करा |
💻नमो शेतकरी नवीन अर्ज करण्यासाठी | 👉क्लिक करा |