Namo Shetkari Yojana 7th Installment Date महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण राज्यभरातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्ता बद्दल देखील आता एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे आणि या अपडेट नुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच रक्कम जमा केली जाणार आहे.
परंतु या हप्त्यामध्ये काही शेतकऱ्यांना मात्र वगैरे जाण्याची दाट शक्यता असणार आहे कारण योजने संदर्भात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार काही प्रमाणामध्ये बदल देखील करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी या संदर्भातील योग्य आणि सविस्तर माहिती घेणे आवश्यक असणार आहे अन्यथा या हप्त्याच्या लाभापासून शेतकरी वंचित राहण्याची देखील शक्यता असणार आहे.
Namo Shetkari Yojana 2025
शेतकरी मित्रांनो सर्वात आधी अजूनही राज्यातील काही शेतकरी असे आहेत की ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केला नाही म्हणजेच की सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील काही कारणास्तव शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ मिळत नसल्याचे देखील अनेक शेतकऱ्यांनी सांगितले आहे आणि त्यामुळेच ही नक्की योजना काय असणार आहे या योजनाचे निकष व या योजनांमध्ये तुम्ही अर्ज कसा करायचा आहे योजनेअंतर्गत कोणत्या प्रमाणे व लाभ देण्याची प्रक्रिया काय आहे यासंदर्भातील देखील माहिती आपण आज घेणार आहोत.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नक्की काय आहे ?
नमो शेतकरी योजनेबद्दल बोलायचे झाल्यास केंद्र सरकारने 2019 पासून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी आणि शेतकरी कुटुंबाचे राहणीमान सुधारणे त्यासोबतच शेतकरी कुटुंबातील मुलांच्या संगोपनासाठी व शिक्षणासाठी अर्थसाहाय्य म्हणून पीएम किसान सन्मान योजना या योजनेची घोषणा केली आणि घोषणा केल्यानंतर सदरील योजनेस त्वरित स्वरूपात अंमलबजावणी देखील करण्याचे आदेश सर्व राज्यांना देखील दिले.
पीएम किसान या योजनेसाठी सुरुवातीला ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच की जे शेतकरी अटी व निकषांमध्ये पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्यांचा सातबारा, त्यासोबतच बँकेचे पासबुक, आधार कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी आपल्या गावाच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन संदर्भातील सर्व कागदपत्रे देखील जमा केली. आणि त्यानंतर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला 6000 रुपये मिळण्यास सुरुवात झाली.
Namo Shetkari Yojana Official Website 2025
या योजनेमध्ये प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून या योजनेबद्दल मोठ्या प्रमाणावर समाधान देखील व्यक्त केले कारण शेतकऱ्यांना वर्षातून तीन हफ्त्यांच्या द्वारे ही सहा हजार रुपयाची रक्कम जमा होत होती. पीएम किसान योजनेअंतर्गत काही राज्यांमध्ये राज्य सरकारने देखील योजनेमध्ये वाढ करण्यासाठी निर्णय घेतले.
महाराष्ट्र राज्य सरकारने 2023 च्या अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेची घोषणा केली आणि पीएम किसान या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना राज्य सरकार द्वारे वाढीव 6000 रुपये निधी देण्याची घोषणा केली आणि परिणामी महाराष्ट्र राज्यातील जे शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकार द्वारे सहा हजार रुपये आणि राज्य सरकार द्वारे सहा हजार रुपये असे वर्षाला 12 हजार रुपये मिळण्यास सुरुवात झाली. नमो शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारने कोणत्याही प्रकारचे नवीन रजिस्ट्रेशन करण्याची देखील आवश्यकता ठेवली नाही पीएम किसानच्या लाभार्थ्यांना थेट नमो शेतकरी या योजनेसाठी पात्र करण्यात आले.
नमो शेतकरी महासन्मान निधी ही एक राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी ची महत्त्वाची योजना आहे ज्या योजनेअंतर्गत राज्यभरातील लाभार्थी शेतकऱ्यांना थेट निधी दिला जातो.नमो शेतकरी योजनेअंतर्गत आजवर राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 06 हप्ते जमा झाले आहेत आणि यापुढे देखील नियमितपणे राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे जमा होणार असल्याचे देखील राज्य सरकार द्वारे वारंवार सांगण्यात येत आहे.तुम्ही अजून या योजनेचे लाभार्थी नसल्यास अर्ज प्रक्रिया सुरू आहेत ज्याचा अर्ज तुम्ही करू शकता.Namo Shetkari Yojana 7th Installment Date
Namo Shetkari Yojana Beneficiery Status
नमो शेतकरी योजना उद्देश :
नमो शेतकरी योजनेच्या उद्देशाबद्दल बोलायचे झाल्यास पी एम किसान योजना या केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना थेट लाभ देणाऱ्या योजनेच्या धरतीवर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वाढ मिळावा आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामे असतील किंवा इतरही कामांसाठी अर्थसहाय्य म्हणून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.
नमो शेतकरी योजनेचा महत्त्वाचा उद्देश हात असणार आहे की येणाऱ्या काळात देखील विविध संकटांवर मात करून शेतकरी खंबीर उभा राहावा आणि शेतकऱ्यांना शेती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठीच राज्य सरकारकडून हातभार म्हणून सदरील योजना राज्यांमध्ये योग्य पद्धतीने राबवली जात आहे.
नमो शेतकरी योजनेचा शेतकऱ्यांना थेट लाभ दिला जातो यासाठी कुठेही शेतकऱ्यांना जावे लागत नाही आणि शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावर हा निधी थेट जमा केला जातो. वर्षातून 03 वेळा केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे पैसे आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना थेट जमा होत असल्याने शेतकरी वर्गात देखील या योजनेबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये समाधान आहे.
Namo Shetkari Yojana Maharashtra Next Installment Date
नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे अथवा वर्ग करण्यात आला आहे. सहाव्या हप्ता बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये महाराष्ट्र राज्यातून तब्बल 93 लाख 20 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या हप्त्या अंतर्गत निधी जमा करण्यात आलेला आहे.
यावेळी मागील काही प्रलंबित हप्ते देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले असल्याने शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यामध्ये या निधी अंतर्गत मोठा फायदा झालेला आहे. राज्य सरकार पीएम किसान योजनेसाठी तसेच नमो शेतकरी योजना असेल अथवा प्रधानमंत्री पिक विमा योजना असेल या योजनेच्या लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा यासाठी देखील वेळोवेळी प्रबोधन करत आहे.
शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत नसल्यास तुम्ही या योजनेसाठी नवीन अर्ज कसा करायचा याबद्दलची देखील माहिती आपण घेणार आहोत. योजनेसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे वेगळा अर्ज करावा लागत नाही परंतु तुम्ही पीएम किसान या योजनेचा देखील अजूनही लाभ घेत नसल्यास मात्र तुम्हाला आधी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्याआधी पीएम किसान या योजनेसाठी तुमचे रजिस्ट्रेशन अथवा नोंदणी करावी लागणार आहे जी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता याबद्दलची सविस्तर प्रक्रिया तुम्ही खाली पाहू शकता.
Namo Shetkari Yojana New Registration Process 2025
नमो शेतकरी योजना/पीएम किसान योजनेसाठी नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया –
- योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईल अथवा कम्प्युटरवरून अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे.
- वेबसाईट ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला उजवीकडे असलेला पर्याय New Farmer Registration यावर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर पुढील पानावर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार नंबर टाकायचा आहे.
- खालील चौकोनामध्ये तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे आणि राज्य निवडून त्याखाली असलेला कॅपच्या कोड टाकून त्याखालील बटन गेट ओटीपी वर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
- यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या अथवा लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर तुम्हाला एक ओटीपी येणार आहे तो ओटीपी टाकून तुम्हाला पुढे जायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर पीएम किसान योजनेसाठी अर्ज ओपन होणार आहे त्या अर्जामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वर असलेली माहिती आपोआप घेतलेली दिसणार आहे कारण यामध्ये ओटीपी द्वारेच आपण ही माहिती घेतली आहे.
- माहिती योग्य आहे का ते तपासून त्यानंतर तुम्हाला खाली यायचे आहे आणि तिथे तुमची रेशनिंग कार्ड वरची माहिती असेल अथवा रेशनिंग कार्ड चा नंबर भरायचा आहे.
- ही प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला बँक पासबुक अथवा बँक अकाउंट नंबर देण्याची आवश्यकता नसणार आहे कारण हे पैसे डीबीटी द्वारे जमा होत असल्याने तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्येच हे पैसे आपोआप पाठवले जातात.
- त्यानंतर खाली तुम्हाला तुमच्या जमीन विषयी माहिती भरायचे आहे ज्यामध्ये रजिस्ट्रेशन आयडी मध्ये तुम्हाला तुमचा फेरफार नंबर टाकायचा आहे त्यासोबतच खाली ज्या गावांमध्ये तुमची शेती आहे त्या गावाची निवड करून त्या ठिकाणी तुमचा गट नंबर आणि तुमच्या नावावर असलेली शेती क्षेत्र भरायचे आहे.
- यामध्ये तुमच्या नावावर ही जमीन कधीपासून झाली याबद्दल तारीख टाकायची आहे आणि ही जमीन तुम्ही विकत घेतली का अथवा तुमची वडीलोपार्जित आहे का याबद्दल माहिती भरायची आहे.
- सर्व माहिती भरल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड त्यासोबतच तुमचा सातबारा व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून अपलोड करायचा आहे जेणेकरून तो योग्य दिसणार आहे आणि तुम्हाला पैसे मिळण्यास अथवा तुमचा फॉर्म स्वीकारण्यास कुठलीही अडचण येणार नाही.
- माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला खालील सबमिट बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे त्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी प्रक्रिया होऊन सर्व माहिती योग्य असल्यास तुम्हाला मेसेज द्वारे देखील कळवले जाते की तुम्ही पीएम किसान या योजनेसाठी आता पात्र ठरणार आहात आणि पुढचे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत.
- पी एम किसान योजनेस तुम्ही पात्र ठरल्यास तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी कुठल्याही प्रकारचा वेगळा अर्ज करावा लागत नाही.Namo Shetkari Yojana 7th Installment Date
Namo Shetkari Yojana 7th Installment Date
नमो शेतकरी योजना पात्रता व निकष काय आहेत ?
- पी एम किसान अथवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी हा अल्पभूधारक शेतकरी असावा.
- शेतकऱ्याच्या स्वत:च्या नावावर शेतजमीन असावी.
- नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेणारा शेतकरी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. शेतकरी वा त्याच्या कुटुंबातील कोणती व्यक्ती सरकारी नोकरदार नसावा.
- नमो शेतकरी अथवा पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी आमदार, जिल्हा परिषद सदस्य अथवा पंचायत समिती सदस्य नसावा.
- शेतकरी दांपत्यापैकी एकालाच या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे.
- शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन २०१९ पूर्वी झालेली असावी.
- लाभ घेण्यासाठी शेतकरी इन्कम टॅक्स अथवा आयकर भरणारा नसावा.
- शेतकऱ्याचे वय 18 ते 60 वर्षादरम्यान असावे

Namo Shetkari Yojana Official Website
नमो शेतकरी योजना FAQ’s :
Q : नमो शेतकरी योजना नवीन अर्ज प्रक्रिया सुरू आहे का ?
A – होय या योजनेसाठी तुम्हाला पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचे आहेत.
Q : नमो शेतकरी योजने अंतर्गत वार्षिक किती लाभ मिळतो ?
A – नमो शेतकरी योजने अंतर्गत वर्षाला 6000 रुपये मिळतात.
Q : या दोन्ही योजनांचे लाभ वेगवेगळे आहेत का ?
A – होय नमो शेतकरी योजने अंतर्गत सहा हजार रुपये आणि पीएम किसान योजने अंतर्गत सहा हजार रुपये असे वर्षाला शेतकऱ्यांना 12000 रुपये मिळतात.
💻नमो शेतकरी वेबसाईट पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | इथे क्लिक करा |